shop now

यंत्राविष्कार

नमस्कार मित्रांनो...

informativein या ब्लॉग वर  आपले आपुलकीने स्वागत. .

स्मार्टफोन हा  सर्व परिचित आहे. स्मार्टफोन ने जगाला जवळ आणले आहे आणि स्मार्टफोन जो वापरात नाही असा कोण नाही. आजचा आपला विषय "स्मार्टफोनची निर्मिती झाली कशी ?" 

स्मार्टफोन हा मोबाईल फोन चा प्रकार आहे. यामध्ये उच्च्स्थरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली होय. काही लोकांच्या मते, स्मार्टफोन हा पूर्णतः संचालन प्रणालीवर तर काहींच्या मते, इ-मेल,इंटरनेट ,रेडिओ इ .सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय. स्मार्टफोनने  २१ व्या शतकातील क्रांतीच होय. जगामध्ये त्याचा वापर मोठया प्रमाणावर होतो आहे या स्मार्टफोनने जगाला झपाटलेले  आहे  असे म्हणणे  वावगे ठरणार नाही.आज जगामध्ये १ अब्ज लोक स्मार्टफोन चा वापर करतात. 

स्मार्टफोनची निर्मिती ;-स्मार्टफोन ची सर्व प्रथम संकल्पना निकोला टेस्ला यांनी सन १९०९ रोजी मांडली.  पुढे सन १९७४ ला या संकल्पनेला पेटंट मिळाले व सन १९९३ ला विक्री करण्यास परवानगी मिळाली.
सन १९९२ साली मध्ये पहिला स्मार्टफोन P. D. A (Personal Digital assistant) च्या साहाय्याने आणि IBM या कंपनीने स्मार्टफोन ला विकसित करून COMDEX येथे यशस्वी प्रयोग केला गेला. नंतर सन १९९४ साली BELL-SOUTH या कंपनीने Simon Personal communicator या नावाने तयार करण्यात आला.
        सन १९९९ साली जपानी फर्म NTT Docomo ने जपान मध्येच सादर करून वापरण्यात आला. हा फोन I-mode या कार्यप्रणाली वर चालत असे. या फोन मध्ये  cHTML चा भाषा म्हणून उपयोग केला गेला.
सन २००० मध्ये windows मोबाइल ची लोकप्रियता वाढत होती.त्या दरम्यान SYMBIAN हा युरोप मधील पहिला स्मार्टफोन तयार करण्यात आला.



NIKOLA TESLA



स्मार्टफोन चे बाजारात आगमन :- 
                                               स्मार्टफोन बाजारात उपलब्ध होण्यास सुरुवात झाली ते २००३ साली पासून. मोटोरोला या कंपनीने  स्वतःचा A760 हा स्मार्टफोन बाजारात आणला आणि २००९ साली अँड्रॉइड चा मोटोरोला cliq हा आणला.नंतर एच . टी. सी कंपनीने एच . टी. सी ड्रीम हा स्मार्टफोन बाजारामध्ये उपलब्ध झाला.

मोटोरोला A760 


HTC dream


स्मार्टफोन चा धुमाकूळ :- जसा हा स्मार्टफोन बाजारात आणला गेला तास धुमाकूळ घातला ते पण संपूर्ण जगामध्ये. या पासून कोणच वाचू शकले नाही अगदी लहान मुले आणि मोठे माणसे सुद्धा. अस्सल गावठी भाषेमध्ये बोलायचे झाले तर "नुसता जाळ अन धूर"
     जगामध्ये एकूण १ अब्ज लोक स्मार्टफोन वापरतात २०१० पासून याचे वेड खूप वाढले जसा काळ चालला आहे तसं तसं प्रगत होत चालला आहे. अमेरिकेत ६५% लोक स्मार्टफोन वापरतात तर युरोप मध्ये ८६० दशलक्ष लोक हे उपकरण वापरतात.  २०११च्या अध्यानानुसार २७% लोक फोटो काढण्यासाठी  स्मार्टफोनचा  उपयोग करतात.

जगातील स्मार्टफोन चे कार्यप्रणाली नुसार वापर 
SourceDateAndroidiOSWindowsBlackBerry OSOthersReference
GartnerQ1 201684.1%14.8%0.7%0.2%0.2%[128]



काय कशी वाटली माहिती? जर या माहिती मध्ये काही सुधारणा सुचवायच्या असतील तर स्वागत आहे. आणि काही चूक झाली असेल तर मोठ्या मानाने माफ करणे.




धन्यवाद. ...










          

No comments:

Post a Comment