shop now

व्यक्तिविशेष

नमस्कार मित्रांनो...

informativein या ब्लॉग वर  आपले आपुलकीने स्वागत. .

आपण लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या विषयी माहिती घेणार आहोत.






लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा जन्म १ ऑगस्ट १९२० साली वाटेगांव तालुका वाळवा जि. सांगली येथे झाला.अण्णांचे नाव तुकाराम भाऊराव साठे हे होय. त्याच्या वडिलांचे  नाव भाऊराव तर आईचे नाव वाळुबाई हे होय. जरी नाव तुकाराम असले तरी त्यानं प्रेमाने सर्व अण्णा असे म्हणत.  वडिलांच्या आग्रहमुळे  अण्णांनी  वयाच्या १४ व्या वर्षी शिक्षण करण्यास सुरुवात केली खरी परंतु जातीने मागास असल्यामुळे त्यांना शाळेतील मुले,शिक्षक त्याच्या बरोबर निर्दयी चे वर्तन करत. त्यामुळं अण्णा शाळेमध्ये फार दिवस गेले नाही.
       अण्णांना विविध छंद होते जसे दांडपट्टा खेळणे,जंगलात एकटे फिरणे,मासेमारी तसेच लोकगीते पाठ करून ती टिपेच्या आवाज मध्ये म्हणणे ,पोवाडे ,लावण्या पाठ करणे अश्या छंदामुळे त्याच्या कडे माणसे जमत असे. रेठऱ्याच्या जत्रेत त्यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांचे भाषण ऐकले परिणामी ते स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झाले. या चळवळीत त्यांनी लोकनाट्यात छोटी-मोठी कामे केली.
 पुढे अण्णा त्याच्या आई -वडिलांना घेऊन मुंबईला आले. मुंबईत पहिला काळ सुखाचा गेला. अण्णा मुंबई फिरत असताना २ गोष्टीकडे आकर्षित झाले
१) राष्ट्रीय संघटना,
२) मूक चित्रपट
    कार्य ;-  
            त्यावेळी ब्रिटिशांचे राज्य होते.राजकीय संघटना यांचे ध्येय ब्रिटिशांना हाकलून लावणे हे होते.अण्णा हे कम्युनिस्ट विचारांचे अनुयायी बनले. पक्षांचे सभेचे आयोजन करणे,मोर्चे काढणे,सभेसमोर गोष्टी सांगणे,पोवाडे, लोकगीते म्हणून दाखविणे यामुळे कम्युनिस्ट वर्तुळात सर्वांनां आवडू लागले. मुंबईत असताना पोटासाठी हमाल,बुटपॉलीशवाला,घरगडी,हॉटेल बॉय असे अनेक कामे केली.या दरम्यान त्यांना सिनेमा पाहण्याचा हा नवीन  छंद लागला. चित्रपटाच्या पाट्या, रस्त्यावरील दुकानांचे बोर्डवरील अक्षरे जुळवित ते साक्षर झाले. या अक्षर ओळखीनंतर वाचनाची आवड निर्माण झाली.
           अण्णा भाऊ साठे यांनी ३५ कादंबऱ्या,८ पटकथा,३ नाटके,१५ प्रवासवर्णन,१३ कथासंग्रह,१४ लोकनाट्ये
१० प्रसिद्ध पोवाडे,व १२ उपहासात्मक लेख लिहले.
त्यांनी  आपल्या पोवाड्यातून,गाण्यातून अनेक सामाजिक,राजकीय प्रश्नांना तसेच राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय समस्यांना वाचा फोडली. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत लोकनाट्य द्वारे जनजागृती.
याच  चळवळीततून महाराष्ट्र राज्य नवनिर्मितीत अण्णा भाऊ साठे,अमर शेख,शाहीर कॉ. द.ना. गव्हाणकर यांचे मोलाचे योगदान.त्यांनी वैजयंता,वारणेचा वाघ,फकिरा अशा अनेक कादंबऱ्या तर कंजारी,कृष्णाकाठच्या कथा असे कथासंग्रह,व त्यांची गाणी आणि लावणी अजूनही लोकप्रिय आहेत,
सन १९६१ साली फकिरा या कादंबरीस सर्वाकृष्ठ कादंबरी पुरस्कार मिळाला आहे.

अशा थोर समाज सुधारक,लोकशाहीर यांनी  १८ जुलै १९६९ साली जगाचा निरोप घेतला.




धन्यवाद....






नमस्कार मित्रांनो...

informativein या ब्लॉग वर  आपले आपुलकीने स्वागत. .

एक दुर्मिळ चित्र 



"स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच"



हि सिंहगर्जना ज्यांची ओळख,भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचे आद्य प्रवर्तक,भारतीय असंतोषाचे जनक,लेखक,संपादक,वक्ते,गणितीतज्ञ,खगोलतज्ज्ञ आणि स्वातंत्र्य सेनानी. लोकमान्य या उपाधी ने ज्यांना संबोधिले जाते असे  म्हणजेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. आज या महामानवाचा पुण्यतिथी दिवस आहे. त्यांचे खरे नाव केशव हे होते. त्यांना घरातील माणसे लाडाने बाळ असे म्हणत पुढे याच नावाने प्रसिद्ध झाले. 
 बाळ हे लहानपासूनच हुशार आणि अन्यायबद्दल चीड होती.त्यांचे वडील गंगाधर रामचंद्र टिळक शिक्षक आणि पंडित होते आणि बाळ यांची आई पार्वतीबाई या घरकाम बघत असत.सुरुवाती पासूनच त्यांचे जीवन खडतर होते.गंगाधर टिळक यांची बदली पुणे येथे झाली.पुणे येथे आल्यावर ऍंग्लो-व्हर्न्याक्युलर शाळेत प्रवेश घेतला आणि काही दिवसामध्ये त्यांच्या आईचे निधन झाले.वयाच्या १६ व्या वर्षी त्यांचे वडील बाळ यांना एकटे सोडून यमलोकी गेले.गोविंदपंत हे बाळ यांचे काका. यांनीच बाळ यांचा सांभाळ केला.

 कसरतीचे महत्व:-बाळ हे १८७२ मध्ये मॅट्रिक झाले. पुढे त्यांनी डेक्कन च्या कॉलेज मध्ये प्रवेश मिळविला.टिळक हे शरीराने लहानपणापासून अशक्त होते त्यामुळे ते त्यांच्या मित्रांच्या चेष्ठेचा विषय बनत असे.हे त्यांनी मनावर घेऊन एक आव्हान म्हणून स्वीकारले आणि तब्बल एक वर्ष आपले संपूर्ण लक्ष शरीर संपादन करणे यावर केंद्रित केले.त्यांनी व्यायाम शाळेमध्ये जाण्यास सुरुवात केली. नियमित व्यायाम हा जणू त्यांचा नियम झालेला होता.कुस्ती,पोहणे,नौका चालविणे हे आवडते खेळ बनले.याबरोबर त्यांच्या शारीरिक आणि मानसिक सुद्धा विकास झाला.कासारातीबरोबर सकस आहार घेण्यास सुरुवात केली. हे सर्व करत असताना अभ्यासाकडे दुर्लक्ष झाले. एक वर्षअखेरीस त्यांची शरीरयष्ठी मजबुत आणि जोमदार बनली.एक वर्ष   



  अभ्यासाकडे दुर्लक्ष झाले असंलेमुळे  ते प्रथम वर्षमध्ये नापास झाले त्याची त्यांना खंत वाटत नसे.या व्यायामाचा उपयोग पुढील आयुष्यामध्ये  शारीरिक आणि मानसिक कष्ठाना सामोरे जाताना झाला.

कॉलेज जीवन :-  डेक्कन कॉलेज मध्ये त्यांना अनेक शिक्षक लाभले.प्रोफेसर वर्ड्सवर्थ आणि प्रोफेसर शूट यांनी त्यांची अभिजात इंग्रजी साहित्यातील रूची निर्माण केली तर प्रो.करू अण्णा अत्रे यांचा प्रभाव टिळक यांच्या वर झाला. प्रो.करू अण्णा अत्रे गणित विषय शिकवीत.याच काळात टिळकांचे वाचन प्रचंड होते.त्यांनी संस्कृत धर्मग्रंथ, इंग्रजीतील राजनीती आणि मेटा-फिजिक्स वरील पुस्तके तसेच संत साहित्य चे  वाचन केले.टिळक हे त्यांच्या मित्रांमध्ये स्पष्ठ वक्ते आणि बेधक म्हणून प्रसिद्ध होते.
     १८७७ मध्ये बी ए चे पदवी घेतली आणि पुढे त्यांनी एल.एल.बी.चे शिक्षण घेण्याचे ठरविले आणि पूर्ण हि केले.कॉलेज मध्ये असताना त्यानं राष्ट प्रेमाने भरलेले होते यासाठीं त्यांनी सरकारी नौकरी करायची नाही आणि दुसरे म्हणजे आपले जीवन राष्ट सेवेसाठी अर्पण करायचे.समाज परिवर्तन व्हावे असे त्यांना वाटत असे परंतु ते शिक्षणशिवाय पूर्ण होणार नाही यासाठी  त्यांनी १ जाने.१८८० साली न्यू इंग्लिश स्कूल ची स्थापना केली. 



अश्या या युगपुरुषाने १ ऑगस्ट १९२० रोजी जगाचा निरोप घेतला.



  


धन्यवाद....





नमस्कार मित्रांनो...



informativein या ब्लॉग वर  आपले आपुलकीने स्वागत. .

आज ३ डिसेंबर हा दिवस डॉ.राजेंद्र प्रसाद यांचा जन्मदिवस.तर वाचकहो आपण त्यांच्या विषयी थोडक्यात  माहिती घेणार आहोत. 

जन्म:-३ डिसेंबर १८८४

संपूर्ण नाव :- राजेंद्र प्रसाद महादेव सहाय 

जन्मस्थळ :- जिरोदेयी .जि. सारण बिहार 

वडील:- महादेव सहाय 

आई :-कमलेश्वरी देवी  

शिक्षण:- M.A(अर्थशास्त्र ),LL.M 


कार्य

१९०६- मध्ये बिहार क्लब चे सचिव झाले. 

१९०८- मध्ये मुझफ्फर येथे ब्राम्हण कॉलेज मध्ये प्राध्यापक म्हणून नौकरी. 

१९०९- मध्ये कोलकाता कॉलेज मध्ये अर्थशास्त्र M.A पूर्ण  

१९१०- मध्ये विधी महाविद्यालया मधून विधी शिक्षण पूर्ण केले 

१९११- रोजी कोलकाता उच्च न्यायालय मध्ये वकिली व्यवसाय मध्ये प्रवेश केला 

१९१४ मध्ये बिहार आणि बंगाल या २ राज्य मध्ये महापूर आल्याने खूप माणसे बेघर झाली परंतु डॉ.राजेंद्र प्रसाद यांनी अहोरात्र पीडित यांना मदत करत. 


१९१७- मध्ये चंपारण्य सत्याग्रह मध्ये शामिल झाले. 

१९२०- महात्मा गांधी यांनी असहकार चळवळ चालू केली त्या मध्ये पण डॉ राजेंद्र प्रसाद यांनी भाग घेतला होता 

१९२१ ला बिहार विश्वविद्यालय ची स्थापना केली 

१९२४ रोजी पाटणा महापालिका चे अध्यक्ष पदी निवड . 

१९३० मध्ये अवज्ञा आंदोलन मध्ये सहभाग असल्याने त्यांना  जेल मध्ये जावे लागले तिथे निकृष्ठ प्रतीचे अण्णा सेवनाने दमा हा रोग झाला.त्याच वर्षी बिहार मध्ये भूकंप झाला. खराब तब्बेत असल्याने त्यांना जेल मधून सोडण्यात आले. भूकंप पीडितांसाठी मदत करण्या साठी 'बिहार सेंट्रल कंमीटी"ची स्थापना केली.त्यावेळी २८ लाख हा निधी मदत म्हणून भूकंप पीडितां मध्ये वाटली 

१९४२ मध्ये "छोडो भारत आंदोलन" सहभाग असल्याने जेलवारी झाली. 

१९४६ मध्ये पंडित नेहरू यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकार ची स्थापना झाली आणि म.गांधी यांच्या आग्रहाखातीर अन्न आणि कृषी विभाग याचे मंत्रिपद स्वीकारले.या पदावर येताच 'अधिक धान्य पिकवा' हि मोहीम राबवली. 

१९४६-४९ दरम्यान ते घटना समितीचे अध्यक्ष म्हणून कार्य केले आणि घटना निर्मिती मध्ये मोलाचे यॊगदान दिले. 

१९५०- साली ते भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणुन नियुक्ती करण्यात आली. २६ जाने. १९५० ते १ मे १९६२ पर्यंत राष्ट्रपती पद सांभाळले.

१९६२-साली "भारतरत्न" या सन्मानाने गौरवण्यात आले. 

२८ फेब्रु १९६३ साली ला या महान नेत्याचा देहांत झाला. 


तसेच त्यांनी त्यांचे आयुष्य देशसेवा मध्ये व्यतीत केले. डॉ. राजेंद्र प्रसाद हे अत्यंत उत्तम लेखक सुद्धा होते. 
"सर्चलीघाट","देश" हे वृत्तपत्रं,"आत्मकथा","चंपारण मे गान्धी","रवादी का अर्थशास्त्र","बापू के कदम में" इ.हिंदी भाषेतील ग्रंथ संपदा आहे 



धन्यवाद..... 












No comments:

Post a Comment